घरगुती खाद्यपदार्थांचे एकमेव व्यासपीठ

आता फक्त काही क्लिकमध्ये उत्कृष्ट घरगुती खाद्यपदार्थ मिळवा!

आता उकडीचे मोदक, पुरणपोळी, पापड, मसाले, वेगवेगळे लाडू ,केक या आणि अशा असंख्य खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी कुठेही शोधाशोध करण्याची गरज नाही. इथे एकाच छताखाली तुम्हाला सगळचं मिळेल, तेही घरबसल्या!

phones

नमस्कार खवय्यांनो! Foodishers मध्ये आपलं स्वागत आहे!

तुमच्या घरगुती खाद्यपदार्थांच्या गरजेसाठी सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या व्यासपीठांपैकी हे एक सर्वोत्तम व्यासपीठ आहे,, जिथे तुम्हाला ताजे, सकस, स्वादिष्ट आणि फक्त घरगुती खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी बनवलेले खाद्यपदार्थ मिळतील.

  मंडळी, बऱ्याचदा असं घडतं, की काही सणावाराच्या प्रसंगी, आनंदाच्या प्रसंगी, वाढदिवशी, सहज चवीत बदल म्हणून, हॉटेलच्या पदार्थांचा कंटाळा आलाय म्हणून, आपल्याला घरगुती खाद्यपदार्थ हवे असतात. उदाहरणार्थ, गणपतीच्या काळात उकडीच्या मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांना मागणी असते.

  आता असे खाद्यपदार्थ आपल्या ओळखीच्या, घराजवळच्या लोकांकडून खरेदी करणं, हा एक ट्रेंड बनत चाललाय; कारण सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात आपल्याला आवड कितीही असली, तरी या ना त्या कारणाने हे पदार्थ बनवायला सवड मिळत नाही. मग आपण काय करतो? तर सोशल मीडियावर कुठेतरी पोस्ट करतो. मग होतं काय? आपल्याला खूप सारे रिस्पॉन्स, खूप सारे मेसेज, खूप सारे फोन येतात; आणि खरंतर त्यातले मोजके दोन ते तीन आपल्या कामाचे असतात. म्हणजे आपल्याला "डेटा" तर मिळतो, पण "माहिती" मिळत नाही. आणि या साऱ्या डेटामधून आपल्याला हवी ती माहिती काढून घेणे ही एक डोकेदुखी होऊन बसते.

  मुळात, एक ग्राहक म्हणून आपले फक्त चार मूलभूत प्रश्न असतात: 

१) मला काय हवं आहे?

२) मला किती हवं आहे?

३) मला कधी हवं आहे?

४) मला कुठे हवं आहे?

आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी खूप झालं!

  अशाच प्रश्नांपासून आपली सुटका करण्यासाठी आम्ही ही नवीन संकल्पना आपल्या सेवेत रुजू करत आहोत, जिचं नाव आहे, "Foodishers".

    इथे, आपण आपल्या परिसरात, शहरात, गावात आपल्याला हवे ते खाद्यपदार्थ शोधू शकता. इथेच आपण त्या पदार्थांची किंमत, प्रमाण, उपलब्धता, रेटिंग आणि विक्रेत्यांची पुनरावलोकने पाहू शकता आणि आणि अशा अनेक गोष्टी करू शकता.

हे कसं काम करतं ?

हे एक अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे.
तुमच्या शहरातील किंवा शहराबाहेरील विविध भागातील विविध विक्रेते या ऍप्लिकेशनमध्ये त्यांच्या खाद्यपदार्थांची यादी करतात. ते त्यांच्याकडील खाद्यपदार्थ त्यांच्या शहरात तसेच शहराबाहेरही विकू शकतात. ते खाद्यपदार्थांचे फोटो, किंमत, उपलब्ध प्रमाण, आवश्यक प्रमाण इत्यादींची माहिती इथे देतात.
या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला तुम्ही आत्ता ज्या विभागात राहतात, किंवा ज्या पिनकोडमध्ये राहतात, तिथे उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांची यादी दिसते. तुम्ही तुमचा विभाग किंवा पिनकोड बदलून सुद्धा कुठल्या भागात काय उपलब्ध आहे, ते बघू शकतात .
तुम्हाला जो पदार्थ खरेदी करायचा आहे, तो तुम्ही इथे रजिस्ट्रेशन ना करताही विकत घेऊ शकतात. तुम्ही वेगळं रजिस्ट्रेशन करू शकतात, किंवा ऑर्डर देतानाही रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकतात .
आपलं नाव, वितरणासाठीचा पत्ता, संपर्क क्रमांक, इ-मेल आयडी, इत्यादि आवश्यक माहिती भरली , की तुम्ही ऑर्डर देऊ शकता.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ऑर्डर देतांना ऑर्डरचे पैसे भरायचे नाहीयेत! ते कधी भरायचे, ते पुढे येईलच!
तुम्ही पाठवलेली ऑर्डर पुढे त्या संबंधित विक्रेत्याकडे मंजुरीसाठी जाते. तुमची ऑर्डर विक्रेता पूर्ण करू शकतो की नाही, हे लक्षात घेऊन तो तुम्हाला प्रतिसाद पाठवतो. विक्रेत्याने जर तुमची ऑर्डर मंजूर केली, तरच तुम्हाला ऑर्डरचे पैसे भरायचे आहेत. ते सुद्धा ५०%!
तसंच महत्त्वाचं म्हणजे, इथे तुम्ही आजच्याच दिवसासाठीची ऑर्डर देऊ शकत नाही. आपले सगळे विक्रेते हे घरगुती विक्रेते आहेत, त्यामुळे जर तुम्ही पुरणपोळी, मोदक, केक, नाश्त्याचे पदार्थ, अशी ऑर्डर देत असाल, तर तुमची ऑर्डर कन्फर्म झाल्याशिवाय ते हे खाद्यपदार्थ बनवणार नाहीत. तुम्हाला ताजे, सकस आणि शुद्ध खाद्यपदार्थ मिळावे, हाच आमचा मानस आहे, त्यामुळे इथले खाद्यपदार्थ आधी ऑर्डर देऊनच बनवले जातात. तसंच एखाद्या पदार्थाची ऑर्डर जर तुम्ही बाहेरगावी असलेल्या विक्रेत्याला देणार असाल, तर वितरणासाठी लागणारा वेळ विचारात घेऊन ती ऑर्डर तुम्हाला किमान दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मिळू शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांमध्ये जसं ऑर्डर दिल्यानंतर १५ ते २० मिनिटात वितरण होतं, तसं इथे नाहीये! आजही आपण मार्केटला जेव्हा या प्रकारचे खाद्यपदार्थ मागवतो, तेव्हा ते आपल्याला नक्कीच १५ ते २० मिनिटात मिळत नाहीत. कारण हे खाद्यपदार्थ कुठल्याही हॉटेलमधून आलेले नसतात, तर घरगुती विक्रेत्यांनी तुमच्या ऑर्डर प्रमाणे बनवून दिलेले असतात.
तुमची ऑर्डर विक्रेत्याने कन्फर्म केल्यानंतर तुम्ही ऑर्डरच्या किमतीच्या ५०% रक्कम भरली, तर आणि तरच तुमची ऑर्डर कन्फर्म म्हणून गणली जाते. उरलेली ५०% रक्कम तुम्हाला ऑर्डरचे वितरण झाल्यानंतर द्यायची असते.
जेव्हा असं काही नवीन व्यासपीठ बाजारात येतं, तेव्हा सर्वात आधी मुद्दा उभा राहतो तो विश्वासाचा! जेव्हा केव्हा आपण अशी एखादी नवीन गोष्ट ट्राय करतो, तेव्हा तिथे जर आपले पैसे जाणार असतील, तर आपण पैसे देण्याआधी नक्कीच शंभरदा विचार करतो; आणि हे योग्य सुद्धा आहे! या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला ऑर्डर देताना पैसे जमा करायचेच नाहीयेत! विक्रेत्याने ऑर्डर कन्फर्म केल्याशिवाय पैसे हा विषय येतच नाही! त्यामुळे तुम्ही इथे निश्चिंत मनाने ऑर्डर देऊ शकता!
वितरण व्यवस्थेबद्दल बोलायचं म्हटलं, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विक्रेत्यांसाठी आम्ही वितरण व्यवस्था देऊ केलेली आहे. जस जसा आमच्या कामाचा व्याप वाढत जाईल, तशी तशी आम्ही इतर शहरांमध्येसुद्धा वितरणाची व्यवस्था करून देणार आहोत.
आम्ही तुम्हाला खात्री देतो, की हे ॲप्लिकेशन वापरल्यानंतर घरगुती खाद्यपदार्थांसाठी तुम्ही इतर कुठे जाणारच नाहीत. कारण तुम्हाला खालील फायदे मिळतात:
१) सोशल मीडियावर शोध घेणं बंद होतं.
२) आपल्या व्हाट्सअप वर येणाऱ्या भारंभार फोटो आणि मेसेजेस पासून सुटका होते.
३) ऑर्डर खरंच हवी असेल, तरच पैसे जमा करावे लागतात.
४) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, एकाच ठिकाणी विक्रेत्यांचे अनेक पर्याय तपासून बघता येतात.ताजे आणि सकस खाद्यपदार्थ

ताजे, सकस आणि पूर्णपणे शुद्ध असे घरगुती खाद्यपदार्थ.

Smiley face

धावपळ टळते

शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टळते.

Smiley face

उत्कृष्ट वितरण व्यवस्था

नीटनेटकी व व्यवस्थित अशी, ओटीपी ने सुरक्षित केलेली वितरण व्यवस्था.

Smiley face
slide-bg
Smiley face

अद्वितीय खाद्यपदार्थ

इतके अनोखे आणि अद्वितीय खाद्यपदार्थ, जे इतर कुठेही सहजतेने उपलब्ध होणार नाहीत.

Smiley face

नेमका शोध

अत्यंत कमी प्रमाणात शोध घेऊन सुद्धा नेमका हवा तोच खाद्यपदार्थ अगदी सहजतेने मिळवा.

Smiley face

दोन भागांमध्ये पैसे द्या

बुकिंगसाठी फक्त ५०% रक्कम भरा, व उरलेले पैसे ऑर्डर मिळाल्यानंतर द्या.
विक्रेत्यांसाठी


पारंपारिक पद्धतीने घरगुती खाद्यपदार्थ विक्री करत असताना तुम्हाला साधारणपणे खालील प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो:
१) ऑर्डर न मिळणे किंवा खूप प्रयत्नानंतर ऑर्डर मिळणे.
२) सोशल मीडियावर खूप जास्त ठिकाणी जाहिरात करत राहावे लागणे.
३) तुमच्या जाहिरातीला प्रतिसाद न मिळणे.
४) आपले नेमके कुठले पदार्थ कुठे विकले जाऊ शकतील, विकले जाऊ शकतील की नाहीत, याचा अंदाज न येणे.
५) "ठीक आहे, कळवतो!" या प्रकारच्या उत्तरांचा फॉलोअप घेत राहणे.
६) "आमच्या गावात मिळेल का?" प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देत राहणे.
७) ग्राहकाने खरेदी करण्याबद्दल नक्की असे काहीच न कळवणे.
८) आम्ही किती चांगला कच्चा माल वापरतो, आमच्याकडची क्वालिटी कशी चांगली आहे, त्यामुळे आमच्याकडच्या किमती कशा रास्त आहेत, हे किमतीवर ऑब्जेक्शन घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला समजावून सांगणे.
९) वेळेवर बुकिंग अमाऊंट न मिळणे.
१०) खाद्यपदार्थ तयार झाल्यावर ती ग्राहकाने ऑर्डर रद्द करणे व पैसे परत मागणे.
११) काही ग्राहकांकडून उरलेल्या पैशांसाठी त्यांचा फॉलोअप घेत राहणे.
१२) जिथून ऑर्डर मिळण्याची सुतराम शक्यता नाही, अशाही ग्राहकांशी फोनवर बोलत राहण्यात वेळ वाया जाणे.
१३) चौकशा शंभर येणे आणि ऑर्डर फक्त दोन येणे.

आता जर ग्राहक तुमच्याकडे "तुम्ही काय काय विकता?" या प्रकारचा प्रश्न घेऊन आला, तर त्याचं उत्तर तुम्हाला खूप लांबलचक असं द्यावं लागतं; ज्यात तुमचे किमान पंधरा मिनिट जातात. एवढं बोलूनही तो ग्राहक ऑर्डर देईल की नाही, याची तुम्हाला कुठलीही खात्री नसते. थोडक्यात आपला फोन नंबर म्हणजे "असून अडचण नसून खोळंबा!" असा प्रकार असतो. व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे फोन नंबर तर द्यावाच लागतो, आणि आपल्याला फोन करून कोणी डायरेक्ट ऑर्डर तर देत नाही! सगळी माहिती जाणून घेणं, हा तर ग्राहकाचा अधिकारच आहे! मग अशा वेळेस काय करायचं?

बघा, असं झालं तर? की ग्राहकाचा तुम्हाला फोन आला, की "मला येत्या २२ तारखेला, सकाळी अकरा वाजता, ग्रीन फील्ड सोसायटी, कोथरूड, पुणे, इथे २५ पुरणपोळ्या हव्या आहेत. तुमचे जे काय चार्जेस असतील, ते मला मान्य आहेत, तरी तुम्ही देऊ शकाल का?" इतकी स्पष्ट ऑर्डर जर असली, तर तुम्ही नाही म्हणण्याचा संबंधच येत नाही.

असं शक्य आहे?

हो, हे शक्य आहे!

ग्राहक जर त्याला काय, किती, कधी, आणि कुठे हवं, याची माहिती घेऊन आणि किमतीवर अजिबात घासाघीस न करता आपल्यापर्यंत पोहोचला, तर यात आपला खूप वेळ वाचतो.

आम्ही तुमच्याकरता नेमकं हेच करत आहोत.

"Foodishers" हे एक डिजिटल शोरूम आहे, ज्यात तुम्ही आपले खाद्यपदार्थ वेगवेगळ्या विभागात, वेगवेगळ्या किमतीने, तुम्हाला हव्या त्या प्रमाणात विकू शकता. साधा नियम आहे की, जिथे जास्त पर्याय उपलब्ध, तिथे ग्राहकांची गर्दी होते.
आज आपण बघतो की प्रत्येक ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्वतःच्या वेबसाईट आहेत. पण आपल्याला गावाला जायचं असलं, की आपण त्यांच्या साइटवर जाऊन बुकिंग करत नाही, तर आपण बुकिंग ऑफिसमध्ये जाऊन, किंवा ट्रॅव्हल्स बुकिंग करून देणाऱ्या एप्लीकेशन चा वापर करून बुकिंग करतो.
का?
तर आपल्याला माहिती असतं, की एका ट्रॅव्हल्सचं बुकिंग मिळालं नाही, तर इथेच आपण दुसऱ्या ट्रॅव्हल्सचंही बुकिंग करू शकतो. यालाच Aggregation (ऍग्रीगेशन) असं म्हणतात. हीच संकल्पना आपण इथे वापरलेली आहे.

तुम्हाला मिळणारे फायदे:
१) कुठल्याही प्रकारचे नोंदणी शुल्क नाही.
२) तुम्ही किती विभागात किती खाद्यपदार्थ जोडायचे, यावर कुठलीही मर्यादा नाही.
३) खाद्यपदार्थांचे प्रमाण, एखाद्या विशिष्ट विभागासाठी किमान ऑर्डर किती प्रमाणाची हवी, तिथे किंमत किती असायला हवी, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य.
४) ऑर्डर मिळण्यासाठी ग्राहकांचा फॉलोअप घेण्याची गरज नाही.
५) आपल्या प्रॉडक्टच्या क्वालिटी बद्दल ग्राहकांना सांगत बसण्याची गरज नाही.
६) फोनवर बोलत राहण्याची गरज नाही.
७) शेकडो ठिकाणी आपली जाहिरात करत बसण्याची गरज नाही.
८) ज्या ऑर्डरचे पैसे आले आहेत फक्त त्यासाठीच खाद्यपदार्थ बनवणे, किंवा पाठवणे.
९) "सर/मॅडम, तुमची ऑर्डर मी नक्की समजायची का?" या प्रकारच्या फॉलॉअपची गरज नाही.
१०) आमच्या किमती कशा रास्त आहेत, हे कोणालाही सांगण्याची गरज नाही.


आमच्याबरोबर कसे जोडले जाल?
आमच्याबरोबर जोडले जाण्यासाठी तुमच्याकडे काही मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत:
१) तुमचा व्यवसाय हा नोंदणीकृत असावा.
२) तुमच्याकडे FSSAI परवाना असावा. (नसला तरी तुमच्याकडून योग्य ती कागदपत्रे मिळाल्यास आम्ही तो तुम्हाला काढून देऊ.)
३) तुमचा नोंदणीकृत व्यवसाय फक्त खाद्यपदार्थांचा च असावा, हॉटेलचे खाद्यपदार्थ आम्ही इथे जोडत नाही.

नोंदणी प्रक्रिया:
१) खाली संपर्क विभागात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेल आयडीवर तुम्ही तुमची माहिती खालील फॉरमॅटमध्ये पाठवू शकता.
१.१) व्यवसायाचे नाव
१.२) तुमचे नाव
१.३) गावाचे नाव
१.४) मोबाईल क्रमांक आणि व्हाट्सअप क्रमांक.
१.५) ई-मेल आयडी
१.६) तुमच्या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती.
२) एकदा तुमची ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली, की आम्ही तुम्हाला संपर्क करू, तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व शंकांचे निरसन करून घेऊ शकता.


स्क्रीन शॉट्स

वापरण्यास अतिशय सुलभ आणि सुटसुटीत कार्यप्रवाह
वितरण


Foodishers™ ही सिस्टीम वितरण व्यवस्थेशिवाय अपूर्ण आहे.आम्ही आमच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना वितरण सुविधा प्रदान करत आहोत. त्यासाठी आम्हाला पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील डिलिव्हरी बॉईज हवे आहेत.

कामाचे स्वरूप:
१) डिलिव्हरी ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी करायची आहे.
२) डिलिव्हरी ही घरगुती खाद्यपदार्थांची असणार आहे.
३) डिलीव्हरीची तारीख व वेळ किमान एक ते दोन दिवस आधी कळेल.
४) त्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन दिले जाईल.
५) त्या ॲप्लिकेशनमध्ये नवीन आलेल्या डिलिव्हरी तुम्ही बघू शकतात, व तुमच्या सोयीने हवी ती ऑर्डर निवडू शकतात.
६) प्रत्येक ऑर्डरमध्ये डिलीवरीची तारीख, वेळ, पिकअप पत्ता, वितरण पत्ता, संपर्क क्रमांक व वितरणाची एकूण रक्कम कळेल
७) दिलेल्या वेळी पिकअप पत्त्यावर जाऊन वितरण पत्त्यावर ऑर्डर पोहोचवायची आहे.

मोबदला:
१) वितरण रक्कम पूर्णपणे तुम्हालाच मिळेल. त्यात "Innomobians" चा कुठलाही हिस्सा नसेल.
२) एका दिवशी पूर्ण केलेल्या सर्व ऑर्डरचा मोबदला तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळेल.
३) अंतर व वजन यानुसार मोबदला बदलता राहील

फायदे:
१) ऑर्डर किमान एक ते दोन दिवस आधी कळणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या इतर डिलिव्हरीची आखणी तुमच्या सोयीने करू शकतात.
२) डिलिव्हरीच्या रकमेतून कोणालाही कमिशन द्यायचे नाहीये.
३) पूर्णवेळ किंवा अर्धवेळ, तुम्हाला हवे तसे काम करू शकतात.

नोंदणी प्रक्रिया:
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता. आम्ही तुम्हाला फोन करू.
रजिस्ट्रेशन लिंक

संपर्क साधा

तुम्हाला ऍप्लिकेशनविषयी, किंवा ते कसे काम करते,याविषयी किंवा इतर काही प्रश्न असल्यास; किंवा जर आम्हाला विक्रेता म्हणून सामील व्हायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.

Owl Image

रहाटणी, पिंपरी-चिंचवड, पुणे

सनराईज व्हिला, तापकीर मळा चौक,रहाटणी, पिंपरी-चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, भारत, पिनकोड - ४११०१७.


मोबाईल: +91 868-603-0371
इ-मेल: connect@foodishers.com