होम किचन बिझनेस मध्ये फोन कॉल्स आणि मेसेजेसमुळे वेळ वाया जात असल्याचं वास्तव

होम किचन बिझनेस मध्ये वेळ वाचवण्याचे पाच सोपे मार्ग

होम किचन बिझनेस करताना सगळ्यात मोठी तक्रार एकच असते — “वेळच मिळत नाही.”

ग्राहकांचे कॉल, सततचे मेसेज, ऑर्डर कन्फर्मेशन, डिलिव्हरीची चर्चा — या सगळ्यात खूप वेळ वाया जातो. पण काही सोप्या सवयी लावल्या, तर बराच वेळ वाचवता येतो.

१) ग्राहकांना एकाच मेसेजमध्ये संपूर्ण माहिती द्या

मेनू, किंमत, वेळ, डिलिव्हरी किंवा पिकअप — सगळी आवश्यक माहिती एका मेसेजमध्ये दिली, तर पुन्हा पुन्हा चॅटिंगमध्ये वेळ जात नाही.

२) डिलिव्हरी की पिकअप — एक ठरवा

या चर्चेतच बराच वेळ जातो. एक स्पष्ट नियम ठेवल्यास संभ्रम टाळता येतो.

३) अर्धी रक्कम ऍडव्हान्स घेताना भीड बाळगू नका

मैत्री वेगळी आणि व्यवसाय वेगळा. ऍडव्हान्समुळे वेळ, मेहनत आणि प्लॅनिंग सुरक्षित राहतं.

४) शक्य असेल तर इंटरॅक्टिव्ह मेनू ठेवा

ग्राहकांना डायरेक्ट ऑर्डर देता आली, तर कॉल्स आणि मेसेज दोन्ही कमी होतात.

५) ऑनलाईन सिस्टीमचा वापर करा

ऑर्डर मॅनेजमेंट आणि पेमेंटसाठी ऑनलाईन सिस्टीम वापरल्यास प्रक्रिया सोपी होते.

महत्त्वाची गोष्ट:
होम किचन बिझनेस म्हणजे फक्त स्वयंपाक नाही. योग्य सिस्टीम असेल, तर वेळ नक्कीच वाचतो आणि बिझनेस टिकतो.